Friday, April 24, 2020
WORLD BOOK DAY
🔷जागतिक पुस्तक दिन: 23 एप्रिल
- संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे 23 एप्रिल 2020 रोजी जगभरात जागतिक पुस्तक दिन (किंवा जागतिक पुस्तक दिन किंवा जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन) साजरा करण्यात आला.
- 2020 या वर्षाची संकल्पना - “शेयर ए मिलियन स्टोरीज”.
- 2020 वर्ल्ड बुक कॅपिटल (एका वर्षासाठी जागतिक पुस्तक राजधानी) - क्वालालंपूर, मलेशिया.
- 2020 या वर्षासाठी दिनाची घोषणा - “KL बाका- केयरिंग थ्रू रीडिंग”.
▪️दिनाविषयी
- दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकांचे आणि वाचन कलेचे जीवनातले महत्त्व पटवून देण्याकरिता हा दिन साजरा केला जातो.
- 1616 साली 23 एप्रिल या तारखेला सर्व्हान्टेस, शेक्सपियर आणि इंका गॅरिसिलो डी ला वेगा या जगप्रसिद्ध साहित्यिकांचे निधन झालेहोते. शिवाय ही तारीख इतर प्रसिद्ध लेखकांची जन्म आणि मृत्यूची तारीख देखील आहे.
- 1995 साली पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) परिषदेत जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यासाठी 23 एप्रिल या तारखेची निवड केली गेली.
- दरवर्षी UNESCO यांच्याकडून एक वार्षिक कार्यक्रम आयोजित केला जातो. प्रत्येक 23 एप्रिलपासून पुढील एका वर्षासाठी जागतिक पुस्तक राजधानी निवडली जाते.
Saturday, April 18, 2020
Subscribe to:
Posts (Atom)