डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले बहुमुल्य पुस्तके ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आली व तसेच शांता शेळके यांचेही पुस्तके ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आली. या कार्यक्रमाबरोबर मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शांता शेळके यांच्या गीतांचे गायन विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. व्ही. एच. फुलझेले, ग्रंथपाल डॉ. एस. एस. वाघमोडे, डॉ. एस. आर. गोरे , प्रा. आर. एस. शनवार , डॉ. डी. डी. कांबळे, श्रीमती सी. आर. कडव आणि इतर प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रंथालय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment